सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अनेक बाबतीत रुग्णांची हेळसांड होत आहे. या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची संख्या चार आहे, शिशु अतिदक्षता विभागात स्टाफ फक्त सहा आहे. जनरेटर एकच आहे, रुग्णवाहिकाही एकच आहे, ही संख्या वाढवण्याच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.