सातारा, प्रतिनिधी
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी उपचार घेत असलेल्यांचा आकडा हा 150 च्या भोवती फिरत आहे. रात्री आलेल्या अहवालाने पुन्हा जिल्ह्याची झोप उडवली आहे. गेल्या 8 दिवसांत नियंत्रण मिळत आहे अशी आशा असतानाच बुधवारी 19 आणि गुरुवारी 22 जण बाधित सापडल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात 9 जण मुक्त झाले आहेत. तर उपचार घेत असलेल्यांचा आकडा 150 च्या पुढे जात 163 इतका वाढला आहे.
22 बाधितांचा तालुका निहाय तपशील
कराड तालुक्यातील उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगांव येथील 53, 28 व 58 वर्षीय महिला, वडगाव येथील 55 वर्षीय महिला, चचेगाव येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील नायगाव येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षाचा मुलागा व 14 वर्षाची मुलगी, करंजखोप येथील 40 व 62 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण.
फलटण रविवार पेठ येथील 68,25,62 व 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 35 वर्षीय महिला तर फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील 45 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील सुरुर येथील 50 वर्षीय पुरुष.
जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष.
उंब्रजमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव
उंब्रज येथील पाटील गल्ली परिसरातील एका २६ वर्षीय युवकाचे रिपोर्ट कोरोना पाँझिटीव्ह आल्याने उंब्रजकरांच्या धास्तीत वाढ झाली आहे. हा युवक २१ जुनला मुंबईहुन आला होता. लक्षणे असल्याने २२ रोजी उंब्रज आरोग्य केंद्रातुन औषधे देण्यात आली पंरतु ताप कमी तपासणीसाठी कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या युवकासोबत कारमधून कुंटूबांतील एक पुरुष, एक महिला व दोन लहान मुले आली आहेत. त्यापैकी एकजन पुन्हा मुंबईला परत गेला आहे.
दिवसभरात 9 झाले मुक्त
यांत
जिल्हा रुग्णालय, सातरा येथून म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुष व किरकसाल येथील 49 वर्षीय पुरुष.
सह्याद्री कराड येथील कराड तालुक्यातील म्हासोली येथील 65 वर्षीय पुरुष व कोरेगांव तालुक्यातील कटापूर येथील 62 वर्षीय पुरुष.
मायणी येथील खटाव तालुक्यातील मायणी येथील 37 वर्षीय पुरुष.
खावली येथील कोरेगांव तालुक्यातील अनपटवाडी येथील 65 वर्षीय महिला.
वाई येथील वाई तालुक्यातील शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, शेलारवाडी (बावधन) येथील 49 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष.
यांचा समावेश आहे.
18 पैकी 13 ठिकाणी एकेरी रुग्ण
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णांवर एकूण 18 ठिकाणी उपचार केले जात आहेत. गुरुवारी एकूण 141 उपचारार्थ दाखल असून त्यातील साताऱ्यात 13, कृष्णात 62, मायणी 13, खावली 10 व फलटण 10 अश्या 5 ठिकाणी 108 रुग्ण आहेत तर उरलेल्या 13 ठिकाणी एकेरी रुग्ण आहेत.
190 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय, सातारा 14, कृष्णा 29, वेणूताई कराड 53, वाई 17, शिरवळ 10, रायगांव 13, पानमळेवाडी 8, मायणी 16 व पाटण येथील 30 असे एकूण 190 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलजे, कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
160 अहवाल आले निगेटिव्ह एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलजे, कराड यांचेकडून 166 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
पुणे – मुंबई प्रवासी अनियंत्रित
सध्या लॉक डाऊन किंवा अन लॉक असा कोणताही भेद सातारा जिल्ह्यात राहिलेला नाही. त्यातही पुणे-मुंबईहुन येणाऱ्या प्रवाश्यांवर कोणाचे व कसलेच नियंत्रण नाही. त्यामुळे जिल्ह्यावरचा धोका अजून कमी झाला असे खात्रीलायक सांगता येत नसल्याचे शासनाचे धोरण आहे.
जिल्हय़ात गुरूवारपर्यंत
एकुण कोरोनाबाधित 886
एकुण कोरोनामुक्त 689
बळी 41
जिल्हय़ात ऍक्टिव्ह रूग्ण 164
गुरुवारी
एकूण कोरोनाबाधित 22
एकूण कोरोनामुक्त 09
बळी 0
दिवसभरांतले निगेटिव्ह 160