17 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 22 उपनिरीक्षकांचीही खांदेपालट
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षक, 17 सहायक पोलिस निरीक्षक व 22 उपनिरीक्षकांच्या पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची सध्याची व बदललेली ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत.
नियंत्रण कक्षातील निरीक्षक नवनाथ घोगरे साबयर पोलीस ठाणे, सुरेश बोडखे वडूज पोलीस ठाणे, प्रभाकर मोरे कोरेगाव पोलीस ठाणे, नवनाथ मदने पोसि कल्याण, भरत किंद्रे फलटण शहर पोलीस ठाणे, महेश इंगळे खंडाळा पोलीस ठाणे, बाळु भरणे कऱ्हाड तालुका, संजय पतंगे शाहूपरी पोलीस ठाणेआर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रताप भोसले यांची जिल्हाविशेष शाखेत, उत्तम ज्ञानू भजनावळे यांची ढेबेवाडी पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा.
विजय घेरडे यांची नियंत्रण कक्षातून शहर पोलीस ठाण्यात, संतोष साळुंखे यांची कोरेगाव पोलिस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात, बाजीराव ढेकळे यांची शहर पोलीस ठाण्यातून म्हसवड पोलीस ठाण्यात, संतोष पवार यांची नियंत्रण कक्षातून ढेबेवाडी पोलीस ठाणे, सतीश शिंदे यांची नियंत्रण कक्षातून कोरेगाव पोलीस ठाण्यात, गणेश वाघमोडे यांची म्हसवड पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा, सरोजिनी पाटील नियंत्रण कक्ष ते कऱ्हाड शहर (वाहतूक शाखा).
रवींद्र तेलतुंबडे नियंत्रण कक्ष ते वाई पोलिस ठाणे, नवनाथ गायकवाड नियंत्रण कक्ष ते फलटण शहर पोलिस ठाणे, रमेश गर्जे नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, चेतन मछले नियंत्रण कक्ष ते शहर पोलीस ठाणे, अमोल माने शहर पोलीस ठाणे ते मेढा पोलीस ठाणे, सागर वाघ स्थानिक गुन्हे शाखा ते बोरगाव पोलीस ठाणे, आशिष कांबळे वाई पोलीस ठाणे ते भुईंज पोलीस ठाणे व अभिजित चौधरी नियंत्रण कक्ष ते तालुका पोलीस ठाणे.
नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अंतम खाडे यांची जिल्हा वाहतूक शाखा, सुनील पवार यांची शिरवळ पोलीस ठाणे, विजय चव्हाण नियंत्रण कक्ष, सदाशिव स्वामी कऱ्हाड शहर, शशिकांत क्षीरसागर खंडाळा पोलीस ठाणे, भीमराव यादव प्रॉसिक्यूशन स्कॉड, देवनंद तुपे दहिवडी पोलीस ठाणे, राजेंद्र काळे कऱ्हाड शहर, शिवाजी घोरपडे प्रॉसिक्यूशन स्कॉड, भरत नाळे कोरेगाव उपअधीक्षक कार्यालय, दत्तात्रय बुलंगे शहर पोलीस ठाणे,अर्जुन चोरगे कऱ्हाड शहर, यशवंत सुरेश महामुलकर पाचगणी पोलीस ठाणे, प्रमोद सावंत रहिमतपूर पोलीस ठाणे, विठ्ठल कृष्णा घाडगे जिल्हा विशेष शाखा, मोहन फरांदे तालुका पोलीस ठाणे, निवा मोरे भुईंज पोलीस ठाणे, अन्वर मुजावर शहर पोलीस ठाणे, प्रकाश उमाप आर्थीक गुन्हे शाखा, सुहास रोकडे शहर पोलीस ठाणे.