दैनिक तरुण भारतच्या पाठपुराव्याला यश
शाहूपुरी : रक्तामुळे रूग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून दैनिक तरुण भारत च्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची डॉ. सुभाष चव्हाण यांनी दखल घेऊन तातडीची बैठक घेण्यात आली. रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपिशवीसाठी धावपळ करावी लागत असल्याने, सातारा जिल्ह्यातील सर्व रक्तपेढयांना दररोजचा रक्तसाठा गुगल शिटवर भरण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील सर्व रक्तपेढयांमधील रक्तसाठा दररोज गुगल शिटवर सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जेणेकरुन जिल्ह्यातील रक्तासाठा, लागणारे रक्त याचा ताळमेळ घालता येईल. रक्त हे अनमोल आहे. कोणालाही रक्तासाठी धावपळ करावी लागू नये, ही या मागची धारणा असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी म्हटले आहे.