सातारा / प्रतिनिधी
कोयना धरणात आज 49.07 उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 49.01 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 175, नवजा येथे 191 व महाबळेश्वर येथे 181 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढीलप्रमाणे –
धोम- 4.94 (42.29)
धोम-बलकवडी- 2.08(52.59)
कण्हेर- 4.44 (46.23)
उरमोडी- 6.41 (66.35)
तारळी- 2.90 (49.58)
निरा-देवघर 3.05 (26.01)
भाटघर- 9.48 (40.35)
वीर – 3.77 (40.09)