सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 346 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
9 बाधितांचा मृत्यु –
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा बनपुरी (ता. खटाव ) येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष असे 7 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने – 37430
एकूण बाधित – 8275
घरी सोडण्यात आलेले – 4449
मृत्यु – 269
उपचारार्थ रुग्ण – 3557