प्रतिनिधी/सातारा
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 57 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तर चौघांचा कोरोनाने बळी गेला आहे.
4 कोरोनाबाधितांचा मृत्यू
कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेतलेल्या तारुख ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, व एकसळ ता. कोरेगाव येथील 66 वर्षीय पुरुष तसेच क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बापूजी साळुंखेनगर कराड येथील 37 वर्षीय पुरुष व चितली ता. खटाव येथील 28 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
57 जणांना डिस्चार्ज
यामध्ये जावली तालुक्यातील पूनवडी येथील वय 12, 5, 34, 55, 34 वर्षीय पुरुष व वय 33, 12, 55, 12, 45, 50, 18 व 45 वर्षीय महिला, सरताळे येथील 50 वर्षीय पुरुष.,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 14,62, 34, 27 वर्षीय पुरुष व 22, 65, 28 वर्षीय महिला.,
सातारा तालुक्यातील सातारा शहरातील बुधवार पेठेतील 12 व 13 वर्षीय मुलगे, यादोगोपाळ पेठेतील 40 वर्षीय पुरुष, मंगळाई कॉलनीतील 34 वर्षीय पुरुष व 56, 37 वर्षीय महिला, सातारा येथील 63 वर्षीय महिला, जिहे येथील वय 50, 72, 42, 69, 19, 24 वर्षीय पुरुष व वय 66, 57, 39, 80, 32, 19, 50 वर्षीय महिला, शहापूर येथील 45 वर्षीय महिला, करंडी येथील 48 वर्षीय पुरुष,19 व 44 वर्षीय महिला.,
कराड तालुक्यातील बनवडी येथील 35 व 43 वर्षीय पुरुष, मसूर येथील 37 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पीटल कराड येथील 31 वर्षीय पुरुष, पंचायत समिती कराड येथील 50 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, ओगलेवाडी येथील 72 व 41 वर्षीय पुरुष.,
पाटण तालुक्यातील कासाणी येथील 40, 15 वर्षीय महिला 14, 25 वर्षीय पुरुष,
595 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 24, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 46, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 27, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 32, वाई येथील 81, शिरवळ येथील 46, रायगाव येथील 47, पानमळेवाडी येथील 71, मायणी येथील 38, पाटण येथील 27, दहिवडी येथील 32, खावली येथील 70 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 54 असे एकूण 595 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
2 जणांचा अहवाल कोरोनाबाधित
जिल्हा रुग्णालय सातारा येथे रॅपिड ॲन्टीजंट टेस्ट (RAT) द्वारे तपासणी करण्यात आलेल्यांपैकी शामगाव ता. कराड येथील 1 व कराड येथील 1 असे एकूण दोनजण पॉझिटिव्ह आलेले आहेत.
घेतलेले एकूण नमुने 22620
एकूण बाधित 2644
घरी सोडण्यात आलेले 1496
मृत्यू 94
उपचारार्थ रुग्ण 1054