प्रतिनिधी / सातारा
सातारा जिह्यात वाढत असलेल्या गुह्यांना आळा घालण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सुचनेनुसार शहरानजिकच्या संवेदनशील असलेल्या प्रतापसिंहनगरात रात्री चार तास सातारा पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवले. प्रतापसिंहनगरातील घरघर, झोपडपट्टी पिंजून काढली. त्यामध्ये पोलिसांना चोरीचा ऐवज सापडला. पाच गुन्हे दाखल झाले असून 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच चोरीच्या 20 दुचाकी जप्त केल्या असून त्याची तपासणी सुरु केल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.
सातारा पोलीसांना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिह्यातील वाढत्या गुन्हेगारीला ब्रेक लावण्यासाठी शनिवारी रात्री 12 वाजता सातारा शहरानजिक जिह्यातील सर्वात मोठ्य़ा झोपडपट्टीत कोंबीग ऑपिरेशन राबवण्यात आले. या ऑपरेशनमध्ये दस्तुरखुद्द अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सह पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचंल दलाल, विभागीय पोलीस अधीक्षक थोरात, केंद्रे, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पतंगे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णसाहेब मांजरे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबीचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम अशा 20 अधिकाऱयांसह 200 पोलीस कर्मचाऱयांनी सहभाग नोंदवला होता.
एकेकाळी प्रतापसिंहनगरात पोलीस जायला भिती असायची. येथील गुन्हेगार व नागरिक पोलिसांना वेढा टाकायचे. येथील गुन्हेगार दत्ता जाधव, त्याचा भाऊ युवराज जाधव, त्याचा मुलगा ललन यांची दहशत प्रतापसिंहनगरपासून ते एमआयडीसी परिसरात चांगलीच होती. दत्ता जाधव याचे कारनामे सातारा पोलिसांना माहिती असूनही कारवाई होत नव्हती. परंतु तात्कालिन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याच झोपडपट्टीतील खंडया नामक गुन्हेगाराला मोक्का लावला. त्या पाठोपाठ दत्ता जाधव, युवराज जाधव या दोघा भावांवर कारवाई केली.
ललनवरही कारवाई केली. त्यामुळे हळहळू प्रतापसिंहनगरातील पोलिसांना नगरात जावू लागले. गुन्हेगारांची माहिती घेवू लागले. रात्रीच्या कोंबिग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी सगळी झोपडपट्टी पिंजून काढली. घर न घर शोधून काढले. त्यामध्ये औद्योगिक वसाहतीत चोरी केल्याचे साहित्य पोलिसांना मिळून आले. तब्बल पाच गुन्हे नव्याने दाखल झाले असून संशयित अशा 12 जणांना ताब्यात घेण्यात आले. 20 दुचाकी चोरीच्या असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.