● कोरोनामुक्तीची वाटचाल 700 कडे
● बाधितांंचा वेग मंदावला
● उपचारार्थ राहिले फक्त 127
● मंगळवारी बाधितांची संख्या फक्त 2
● एका बाधिताचा मृत्यू
सातारा, प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना मुक्तीचा वेग वाढतच असून आजपर्यंत एकूण 678 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. कोरोना मुक्तीची वाटचाल 700 कडे सुरु असून मंगळवारी जिल्ह्यातील दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर दिवसभरात फक्त दोन बाधित आढळून आले असून यामध्ये पाटण व कराड तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. फलटण येथील सारी व कोविड बाधित 62 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आज 10 जणांना दिला डिस्चार्ज
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून व कोरोना केअर सेंटर मधून 10 जणांना आज 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 57 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष, बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष, निढळ येथील 24 वर्षीय महिला माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील 63 वर्षीय महिला, कोरेगांव येथील 53 वर्षीय महिला व चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष. सातारा येथील निशिगंधा कॉलनी बारवकर नगर येथील 14 व 17 वर्षीय युवती.
दोन नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या दोन नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये पाटण तालुक्यातील सडा दाडोली येथील 70 वर्षीय पुरुषाचा व कराड तालुक्यातील चरेगाव येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सारी, कोविड बाधित रुग्णाचा मृत्यु
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा फलटण येथील सारी व कोविड बाधित 62 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
101 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह
काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड यांच्याकडून 101 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले आहे.
उपचारार्थ उरले 127 रुग्ण
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 846 झाली असून कोरोनातून बरे झालेल्या 678 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 127 इतकी झाली आहे.
मृतांची संख्या झाली 40
शासनाच्या नियमाप्रमाणे मृत्यू पश्चात चाचणी करायची नसल्यामुळे कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये दि.19 जून रोजी मृत्यू झालेला.मृत्यू पश्चात बाधित निघाला होता.तो बाधित मृत्यू मधून कमी केल्यामुळे आता बाधित मृत्यूची संख्या 40 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गडीकर यांनी दिली.
218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रातीसिंह नानापाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 85, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 38, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 1, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 17, शिरवळ येथील 9, रायगांव 15, पानमळेवाडी 19, मायणी 11, महाबळेश्वर 4, पाटण येथील 8 असे एकूण 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून, एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत.
मृतकाची नोंद कोविड बाधितांमध्ये
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दि. 19 जून रोजी 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात घेतलेला नमुना पॉझिटिव्ह आला होता व त्याच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नव्हती वरिष्ठांकडून सूचनेनुसार या मृत्यूची नोंद कोविड बाधित मृत्यू मध्ये करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 40 कोविड बाधित मृत्यू झाले आहेत असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
मंगळवार पर्यंत जिल्ह्यात
एकूण बाधित 845
एकूण मुक्त 678
बळी 40
मंगळवारी
एकूण बाधित 02
एकूण मुक्त 10
बळी 01