*आकडे समाधानाचे पण भीती घालवणारे पण काळजी हटवणारे*
● सातारच्या गुरुवार पेठेत घबराहट
● गेल्या तीन आठवड्याचे दिलासादायक चित्र
● चार हॉस्पिटलमध्ये 100 बाधित
● चार सेंटर्समध्ये 1 ही रुग्ण नाही
● अन्य ठिकाणी बाधितांची संख्या 7पेक्षा कमी
प्रतिनिधी/सातारा
खरंतर साताऱ्यात कोरोनाचा पाठ शिवणी चा खेळ सुरू आहे. भीती तितकीच आहे पण लोक का कोण जाणे घाबरेनासे झालेत. गेल्या तीन आठवड्यांचा मागोवा घेतला तर दिलासादायक आहे. तर रविवारी सकाळी 14 बाधित सापडले असले तरी संध्याकाळी 19 मुक्त झालेत. यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या पुन्हा दिडशेच्या खाली येत 136 वर आली आहे. मात्र हेच समाधान देणारे आकडे सर्वदूर झाले की काळजी घेण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे विदारक चित्र आहे.
*गेले 3 आठवडे दिलासादायक*
1 मे ते 21 मे असे धरले तर या तीन आडवाड्यात बाधित 262, मुक्त झालेले 424, बळी 18 आणि निगेटिव्ह 2329 असे आकडे आहेत. म्हणजे, जितके बाधित त्यापेक्षा मुक्त होणाऱ्यांची संख्या सुमारे दीड पट आहे.
*सातारच्या गुरुवार पेठेत कंटेन्मेंट झोन*
गुरुवार पेठेतील 54 वर्षीय महिला किडनीच्या व्याधीने आजारी होती. साताऱ्यात तीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कराड कृष्णामध्ये उपचारासाठी दाखल केले. तिचे स्वाब 19 रोजी घेतले तर दुसऱ्या दिवशी बाधित असल्याचा अहवाल आला. ती कोणाच्या संपर्कात आली नव्हती.
*136 पैकी 100 रुग्ण, 4 ठिकाणी*
जिल्ह्यात सर्व तालुक्यात कोरोना केअर सेंटर बनवली आहेत पण जिल्हा रुग्णालय 31, कृष्णा 45, पाचगणी13, खावली 11 येथेच 100 रुग्ण आहेत. तर कोरेगाव, रायगाव, म्हसवड व शिरवळ या 4 सेंटर वर 1 ही व्यक्ती नाही. राहिलेल्या सेंटरवर 7 च्या आत रुग्ण संख्या आहे.
*14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह*
*फलटण* शेरेचीवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष व फलटण येथील 27 वर्षीय महिला. *कराड* वडगाव (उंब्रज) येथील 28, 20 व 44 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष. *माण* खोकडे येथील 34 वर्षीय पुरुष. *जावली* म्हातेखुर्द येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष. *सातारा* राजापुरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला.
*रविवारी मुक्त झालेले 19 जण*
*जिल्हा रुग्णालय सातारा* शिरवळ ता. खंडाळा येथील 48 वर्षीय पुरुष, वेळे ता. वाई येथील 59 वर्षीय पुरुष. *फलटण* येथून फलटण तालुक्यातील वडले येथील वय 40, 89 व 30 वर्षीय पुरुष व वय 12 मुलगा व 1 वर्षाचे बाळ. *पार्ले* येथून कराड तालुक्यातील तुळसण येथील वय 50 व 22 वर्षीय महिला.*मायणी* येथून खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील 76 वर्षीय वृध्दा. शिरवळ येथून खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 25 वर्षीय पुरुष. *वाई* येथून वाई तालुक्यातील पाचवड येथील 52 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वय 58 27 व 29 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला तसेच 13 व 16 वर्षीय युवती, व आसरे येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
*जिल्हय़ात रविवार पर्यंत*
बाधित 818
मुक्त 643
बळी 39
उपचार घेत असलेले 136
*रविवारी*
बाधित 14
मुक्त 19
बळी 00