जिल्हाध्यक्ष तेजस शिंदें यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तरुणाईला भुरळ
पहिल्या टप्यातल्या निवडी दि. 29, 30 रोजी
शिवसेनेसह इतर पक्षातील युवकांचा होणार राष्ट्रवादीत प्रवेश
प्रतिनिधी / सातारा
आमदार शशिकांत शिंदे हेच युवकांच्या ह्रदयातले नेते आहेत. तर त्यांच्या चिरंजीवांची गाथा वेगळीच. जातपातधर्म भेद सोडून कार्यकर्ता हेच सूत्र माणून काम करणारे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी स्वतःची क्रेझ निर्माण केली आहे. युवकांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने त्यांनी केली आहेत.
अडचणीत असलेल्या युवकांसाठी लगेच मदतीला उभ्या रात्री धावून जाणारी टीम त्यांनी सक्रिय केली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक भक्कम होत असून इतर पक्षातील युवकांना त्यांच्या नेतृत्वाची भुरळ पडली आहे. शिवसेनेसह इतर पक्षातील युवक राष्ट्रवादी युवकमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी युवक पदाधिकारी निवडी पहिला टप्पा दि.29, 30 रोजी जिल्ह्यात कोरेगाव, सातारा, माण आणि खटाव या तालुक्यात आयोजित करण्यात आला आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकमध्ये जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांनी आपला कार्यअहवाल घेऊन मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी केले आहे.