आठवड्यात अडीच पटहुन अधिकने वाढ
● सातारा जिल्ह्याने शंभरी ओलांडली
● सातारा, अंजली कॉलनीत 01
● कराड, मंगळवार पेठेत 01
● सातारा कारागृहात 05
● कराड तालुक्यात 15 वाढले
● जिल्हा 113, कराड तालुका 86.
● 7 दिवसांत अडीच पट कोरोनाबाधित वाढले
● कराड तालुक्यात कोरोना पसरला
सातारा/प्रतिनिधी
देशभरात तिसरा लॉकडाऊन सुरू होऊन चार दिवस होत असताना सातारा जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. दुपारी अडीच वाजेपर्यंत जिल्ह्यात 21 अहवाल पोझेटिव्ह आले आहेत. यात शाहूपुरीच्या अंजली कॉलोनीतल्या वृद्धासह सातारा कारागृहातले 5 कैदी तर कराड तालुक्यातील 13 जणांचा समावेश आहे. एकाच दिवशी कोरोना रुग्ण वाढण्याचा हा जिल्ह्यातला सर्वात मोठा आकडा आहे.
दर गेल्या 7 दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा एकदम अडीच पट वाढला आहे.
सातारा कारागृहात हैदोस पुण्याहून सातारा कारागृहात 5 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याहून सातारा कारागृहात आणलेल्या 48 पैकी 4 कैद्यांना लागण झाली होतीच त्यात गुरुवारी 5 जणांची वाढ झाली होती. त्यामुळे सातारा कारागृहात हैदोस सुरू असला तरी आतील अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, साताऱ्यातील स्थानिक आरोपी-कैदी यांनी आतल्या आत आंदोलन करण्याची तयारी सुरू केली असल्याचे कळत आहे.
अंजली कॉलोनी सील करा
प्रतापगंज पेठेतील बाधित तरुणांच्या संपर्कात आल्याने त्याची मावशी गुरुवारी बाधित असल्याचे समजले. त्यांना क्वारान्टीन केले होतेच. सदर महिला ही शाहूपुरीच्या अंजली कॉलोनीत ( आर्यांगल अर्कशाळेच्या समोर ) राहणारी असून संपूर्ण कॉलोनी सील करा अशी मागणी होत आहे. साताऱ्यासह शाहूपुरीत घबराहट निर्माण झाली असून सारा परिसर क्षणार्धात सुनसान झाला आहे. कॉलोनीतुन बाहेर येणारे सर्व रस्तेही बंद करावेत, अशी जोरदार मागणी सुरू आहे.
कराडच्या मंगळवार पेठेत वृद्धेला कोरोना
कराड तालुका हॉट स्पॉट असला तरी शहर थोडं निर्धास्त होतं. गुरुवारी मंगळवार पेठेतील एका 65 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण झाली. कोटेजमधील एका बाधा झालेल्या महिला आरोग्यकर्मीच्या संपर्कात आल्याने त्यांना बाधा झाल्याचे बोलले जात आहे.
कराड तालुक्यात कोरोना पसरतो आहे
कराड तालुका जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा हॉट स्पॉट बनला असला तरी वनवासमाची व मलकापूर पर्यंत त्याला मर्यादा होत्या.
गुरुवारी दुपारी 2 पर्यंत आलेल्या अहवालात तालुक्यात 15 रुग्ण आढळले आहेत. त्यात
वनवासमाची 2,
मलकापूर-अहिल्यानगर 2,
आगाशिवनागर 3,
कराड शहर 1
उंब्रज 1
याशिवाय कराड तालुक्यातील तांबवे, गमेवाडी, गोटे, बनवडी या गावाचा समावेश झाल्याने प्रंचड हडकंप माजला आहेत. तालुक्याच्या अन्य गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्यांच्या नक्की साखळ्या कोणत्या? यापैकी कोणा-कोणाला आधीच क्वारंन्टीन केले होते का? याची वेगाने माहिती गोळा केली जात आहे.
उंब्रजमध्ये बाल रोगतज्ञ कोरोनाबाधित
डेरवण ता. पाटण येथील बालकाच्या संपर्क आलेले उंब्रज मधिल डॉक्टर ( बाल रोगतज्ञ ) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. डेरवण येथील बाळ कोरोनामुक्त झाले आहे. तर संबंधित डॉक्टरांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता आणि आता दुसरा अहवाल पोझेटिव्ह आला आहे.
केवळ 7 दिवसांत अडीच पटहुन रुग्ण वाढले
देशांतला दुसरा लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी तीन दिवस म्हणजेच गुरुवार 30 एप्रिलला जिल्हयात 43 रुग्ण होते. आता या आठवड्यात म्हणजे दुसरा लॉक डाऊन सुरू होऊन अवघे चार दिवस होत आहेत तोवरच जिल्ह्याचा आकडा 43 वरून 113 वर म्हणजे सुमारे अडीच पटीहुन अधिक वाढला आहे.