प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण सरासरी 42.34 मि.मी. पाऊस झाला असून आजअखेर 866.19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 49.33 (690.60) मि. मी., जावली – 59.04 (1133.93) मि.मी., पाटण – 67.55 (1051.73) मि.मी., कराड – 35.92 (487.61) मि.मी., कोरेगाव – 27.89 (443.27) मि.मी., खटाव – 17.69 (367.71) मि.मी. माण –8.86 (305.57) मि.मी., फलटण –7 (290.51) मि.मी., खंडाळा – 23.03 (373.93) मि.मी., वाई –35.86 मि.मी.,(594.40), महाबळेश्वर–204.54 (3788.82) याप्रमाणे आज एकूण 536.71 मि.मी. तर आजअखेर 9528.08 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी
सातारा : कोयना धरणात आज 85.23 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 85.12 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 182 नवजा येथे 324 व महाबळेश्वर येथे 203 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 9.11 (77.96), धोम-बलकवडी- 3.60 (90.99), कण्हेर – 8.80 (91.77), उरमोडी – 9.08 (94.07), तारळी- 5.27 (90.18), निरा-देवघर 7.80 (66.55), भाटघर-18.67 (79.43), वीर – 9.29 (98.81).