प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यातील स्थिती पुन्हा गंभीर झाली असून गेल्या दोन, तीन दिवसांतील आकडे पाहता शेवटी केंद्रीय पथक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. रविवारी केंद्रीय पथकाने ही स्थिती रोखण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. दरम्यान, शनिवारी 854 जणांचा अहवाल बाधित आला आहे. तर रविवारी सायंकाळी कोरोनामुक्तीचा रेट वाढता राहिल्याने 432 जणांना घरी सोडण्यात आले असले तरी मृत्यूदर वाढू लागल्याची चिंता वाढू लागलीय. 7 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय. तर दुसरीकडे लस उपलब्ध झाल्याने लसीकरणालाही वेग आला असून कोरोनामुक्तीचा वाढता रेट दिलासा देवू लागलाय.
3 लाख 23 हजार 865 जणांचे लसीकरण
एकीकडे बाधित वाढ होत असताना आणि विकेंड लॉकडाऊनमध्ये देखील लसीकरण मोहिमेला गती आली असून रविवारी दिवसभरात जिल्ह्यात 28 हजार 509 जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 3 लाख 23 हजार 865 जणांचे लसीकरण झाले असून यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 2 लाख 85 हजार 503 असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 38 हजार 262 एवढी असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
दोन तालुके 100 च्या वर, 9 तालुके खाली
सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, वाई, खंडाळा तालुके हॉटस्पॉट ठरलेत. शनिवारच्या अहवालात फलटणमध्ये तब्बल 142 तर कराडमध्ये 118 बाधित समारे आले तर साताऱ्यात थोडासा वेग मंदावल्याने 98 बाधित समोर आलेत. खटाव, माण, पाटण, कोरेगाव, जावली या तालुक्यात बाधितांची संख्या 50 च्या खाली राहिल्याचा दिलासा आहे. मात्र, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असताना देखील कोरोनाचा कहर सुरुच असून थंड हवेचे ठिकाण असलेला महाबळेश्वर तालुकाही आता मागे राहिलेला नाही. या तालुक्यात एकटÎा कलामगावात 28 बाधित समोर आल्याने खळबळ उडालीय.
जिल्ह्यात 7 बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा सातारा ता. सातारा 75 वर्षीय महिला, वावरे ता. माण 66 वर्षीय पुरुष, ताथवडे ता. फलटण 58 वर्षीय महिला, लिंब ता. सातारा 57 वर्षीय पुरुष, केळघर ता. जावली 74 वर्षीय महिला, आनेवाडी ता. जावली 70 वर्षीय महिला व खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये संगमनगर ता. सातारा 70 वर्षीय पुरुष असे एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु अशा झाला आहे.
रविवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 4,36,621
एकूण बाधित 63,767
घरी सोडण्यात आलेले 63,335
मृत्यू 1,971
उपचारार्थ रुग्ण 7,456
रविवारी जिल्ह्यात
कोरोनामुक्त 432
बळी 07