सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 28, प्रवास करुन आलेले 6, सारी 1, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 2, आरोग्य सेवक 1 असे एकूण 38 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 25 पुरुष व 13 महिलांचा समावेश आहे तसेच सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात पुण्या ,मुंबईहुन आलेल्यापेक्षा आता त्यांच्या निकट सहवासीत असलेल्या लोकांमध्ये कोरोना पसरत असल्याचे समोर यायला लागले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याने अधिक सावधान होण्याची गरज आहे. गुरुवारी 38 पैकी 28 बाधित रुग्ण हे निकट सहवासीत प्रकारातले आहेत.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील चव्हाण आळी येथील 20 वर्षीय युवक व 50 वर्षीय महिला, शिरवळ मधील शिंदेवाडी येथील 36, 21 व 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष,
कराड तालुक्यातील तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर मलकापूर येथील 24 व 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, कराड येथील 26 वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील सोनगीरीवाडी धोम कॉलनी येथील 58 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय युवक, 27 व 55 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 72 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय बालक, 27 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, सोनजाई विहार बावधन नाका येथील 16,20,40 वर्षीय महिला, खानापूर येथील 27 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, शिरगाव येथील 31 वर्षीय पुरुष
शाहूनगर येथील 20 वर्षीय युवक, जैतापूर येथील 30 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका येथील 48 वषीय् महिला, संगमनगर येथील 14 वर्षीय मुलगी, खावली येथील 46 वर्षीय पुरुष, करंजे येथील40 वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील 18 वर्षीय युवक
कोरेगाव 2 तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिला व 6 वर्षीय बालिका,
पाटण 2 कोयनानगर येथील 55 वर्षीय पुरुष, काजरेवाडी, खाले येथील 35 वर्षीय पुरुष
फलटण 1 घाडगेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष
खटावमध्ये 1 कातरखटाव येथील 22 वर्षीय पुरुष यांचा समावश आहे.
काल रात्री सातारा येथील गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला व रविवार पेठ येथील 49 वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.54 वर्षीय महिलेस तीव्र मूत्रपिंडाचा आजार व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच व 49 वर्षीय पुरुष कोल्हापूर येथून प्रवास करुन आलेले असून त्याला अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता.
गुरुवारपर्यंत
घेतलेले एकुण नमुने 13533
एकूण बाधित 1,145
मुक्त / घरी सोडण्यात आलेले 743
मृत्यु 48
उपचारार्थ रुग्ण 354
.