प्रतिनिधी / सातारा
काल रात्री सातारा येथील खाजगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरु असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील 71 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असून उपचारा दरम्यान त्याचा स्त्राव तपासणीकरिता खाजगी प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेला होता. त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे. हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबई वरून आला होता. अशी माहिती संबंधित रुग्णालयाने दिली असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
115 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 89 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी 26 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविली आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 727 झाली असून कोरोनातून 499 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 194 इतकी झाली आहे तर 32 जणांचा मृत्यु झालेला आहे.