वाई, कराडमध्ये २९ पोलीस क्वारंटाईन
सातारा/प्रतिनिधी
सातारा जिल्हय़ावरील कोरोना प्रार्दुभावाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असतानाच लॉकडाऊन करावा की नाही या द्विधा मनस्थितीत प्रशासनासह नागरिक देखील अडकले आहेत. दुसरीकडे कोरोना संसर्ग वाढत असल्याने त्याचीही भीती नागरिकांच्या मनात आहे. मात्र, ज्यांच्या जवळ रुग्ण सापडतात ते गंभीर तर ज्या परिसरात रुग्ण नाहीत ते नागरिक निष्काळजीपणे गर्दी करतानाचे चित्र जिल्हय़ात दिसत आहे. दरम्यान रात्री उशिरा आलेल्या अहवालात 67 बाधित असून कोरोना बागी त्यांच्या आकड्याने 1800 चा आकडा पार केला आहे. तर 29 जणांची कोरोना मुक्ती तर कराडचे कोरोना मुक्ती मधील त्रिशतक दिलासादायक ठरले. मात्र पोलीस दलात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून कायद्याच्या संपर्कात आलेले कराडचे 16 तर वाईत बाधित वाहतूक पोलिसांच्या संपर्कात आलेल्या 13 अशा एकूण 29 पोलिसांनी कोरंटाईन करण्यात आले आहे.
सिव्हिलमध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग
या अतिदक्षता विभागात 14 आयसीयु बेड, 7 व्हेंटीलेटर तसेच इतर सुविधा कोरोना सेंटरमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सर्वसामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेले हे सेंटर सर्वसामान्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. सध्या जिह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे, नागरिकांनी घाबरुन न जाता काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील 29 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 29 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. यामध्ये कराड तालुक्यातील
कराड शहर – सोमवार पेठमधील 46 वर्षीय महिला, बनवडी येथील 48 वर्षीय पुरुष, तळबीड येथील 43 वर्षीय पुरुष, कृष्णा रुग्णालातील 26 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50 वर्षीय पुरुष, हावलेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, तारुख येतील 40 व 45 वर्षीय महिला, जखिणवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, लटकेवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 55 वर्षीय महिला.
पाटण तालुक्यातील नवसारी येथील 15 व 17 वर्षीय तरुण, 36 वर्षीय महिला, सडादाढोली येथील 29 वर्षीय महिला, 11 व 4 वर्षीय बालिका, काजरवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, उरुळ येथील 60 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील
सातारा शहर – प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, जिहे येथील 42, 20, 49, 36, 25 वर्षीय पुरुष, 25 महिला.
खटाव तालुक्यातील कातरखटाव 27 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 55 वर्षीय महिला.
एका बाधिताचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुनवडी ता. जावली येथील 67 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, या पुरुषाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
रविवारी रात्री अहवालात 59 कोरोना बाधित
आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिह्यातील निकट सहवासित 52, सारीचे 6 आणि प्रवास करुन आलेले 1 असे एकूण 59 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा तालुका व शहरात गंभीर स्थिती
सातारा येथील 63 व 69 वर्षीय महिला, जिहे येथील 50, 34, 16 व 46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, रॉयल सिटी येथील 58 व 35 वर्षीय महिला व 8 वर्षाची मुलगी, यादोगोपाळ पेठ येथील 32 वर्षीय पुरुष, राधिका रोड येथील 58 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, करंडी येथील 36 वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आल्याने सातारा तालुक्यासह शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली असून संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
कराडमधील व्यापारी बुधगावमध्ये बाधित
कराडच्या रविवार पेठेतील अंकुश चौकात राहणारा व्यापारी बुधगावमध्ये गेल्यानंतर पॉझिटिव्ह आला आहे. या व्यापाऱयाचे मुळीक चौकात कटलरीचे दुकान आहे. कटलरी साहित्य आणण्यासाठी तो सतत मिरजला जात होता. दोन महिन्यापूर्वी त्याला नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले होते. 8 जुलै रोजी तो बुधगावला गेला. 9 तारखेला त्याला त्रास होऊ लागल्याने तेथे मिरज हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. 11 रोजी तो पॉझिटिव्ह आला. दरम्यान त्यांचे कुटुंबही बुधगावला गेले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने येथे भेट देऊन मायक्रो कंटेनमेंट झोन केला आहे. त्या इमारतीतील 22 जणांना क्वारंटाईन केले आहे.
कराडच्या चौघा पोलिसांसह 13 जण क्वाॅरंटाईन
कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील चार पोलिस कर्मचाऱ्यांसह 13 जणांना क्वाॅरंटाईन करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला कराडला आणून त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर त्याला पुन्हा येरवडा कारागृहात नेऊन सोडण्यात आले. तेथे संशयिताची कोरोना टेस्ट घेतल्यानंतर ती पॉझिटीव्ह आली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वाॅरंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे 4 कर्मचारी व गार्ड असे एकूण 13 जणांना क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे.
वाईच्या वाहतूक पोलिसामुळे 16 पोलीस कोरोनटाइन
वाई शहरातील वाहतूक शाखेचा एक जवानाचा रविवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यामुळे वाई पोलीस ठाण्यातील 16 पोलीस जवान कोरोनटाइन करण्यात आले आहेत. वाई पोलीस ठाण्यात त्या जवानांचे घेतलेल्या स्वँबचे रिपोर्ट कधी येतील याची उत्सुकता लागून राहिली आहे. वाई पोलिस ठाण्यात जवान, अधिकारी तसेच वाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलयात जवान अधिकारी यांच्यामध्ये कोरोनाची धास्ती लागून राहिली आहे.
जावली तालुक्याची चिंता वाढली
जावली तालुक्यात पुनवडी येथील 47, 34, 55, 48, 55, 47, 42, 50, 61, 47, 62,व 40 वर्षीय पुरुष, तर कुसुंबीमुरा येथील 30 वर्षीय महिला यांचा बाधितांमध्ये समावेश असून रविवारी रात्री उशिरा पुनवडी येथील 10 जणांचा अहवाल व आज (सोमवारी)सकाळी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुनवडी येथील बधितांची संख्या 30 झाली आहे. पुनवडी येथील बधितांची संख्या वाढू लागल्याने जावळी तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.
कोरेगावात 8 तर फलटणमध्ये 6
यामध्ये कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु. येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षाचे बालक, कोरेगाव येथील 30 व 36 वर्षीय महिला, वाठार किरोली येथील 17 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला, नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष, चिमणगांव येथील 45 वर्षीय पुरुष. फलटण तालुक्यातील सरडे येथील 55 व 20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णे येथील 43 वर्षीय पुरुष,
वाई व खंडाळय़ातही गंभीर स्थिती
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील परिस्थिती चिंताजनक होवू लागली असून रविवारच्या अहवालत पुन्हा 65, 23, 45, 70 व 32 वर्षीय महिला या पाच बाधितांची भर पडलीय. खटाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील परखंदी येथील 49 व 38 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला व 8 वर्षाचा बालक, नव्याचीडी येथील 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 33 वर्षीय पुरुष, 4 वर्षाचे बालक व 34 वर्षीय महिला.
503 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा 27, कृष्णा हाॅस्पिटल कराड 76, उपजिल्हा रुग्णालय कराड 60, कोरेगाव 13, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 55, शिरवळ 84, रायगाव 29, पानमळेवाडी येथील 21, मायणी 22, महाबळेश्वर येथील 6, पाटण 38, खावली 28, दहिवडी येथील 27, असे एकूण 503 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण बाधित 1821
एकूण मुक्त 1066
एकूण बळी 66
उपचारार्थ असलेले 682
सोमवारी
एकूण बाधित 67
एकूण मुक्त 29
एकूण बळी 01