प्रतिनिधी / सातारा
विविध रुग्णालयात तसेच कोरोना केअर सेंटर्स मध्ये उपचार घेवून कोरोनातून बऱ्या झालेल्या 10 नागरिकांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. बरे होवून घरी सोडलेल्यामध्ये पाटण तालुक्यातील दिवशी बु. येथील 31 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील वडगाव येथील 57 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहूली येथील 50 वर्षीय पुरुष, पिंपळवाडी-धावडशी येथील 36 वर्षीय महिला, सातारा शहरातील रविवार पेठेतील 14 वर्षीय युवती. शाहूनगर (सातारा) येथील 50 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला व 15 वर्षीय युवती. फलटण तालुक्यातील* तांबवे येथील 40 वर्षीय पुरुष, वडले ता. 45 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
248 नागरिकांच्या घशातील नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 72, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 32, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 55, उपजिल्हा रुग्णालय वाई येथील 7, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 5, कोरोना केअर सेंटर शिरवळ येथील 7, रायगाव येथील 10, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 39 अशा एकूण 248 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.