प्रतिनिधी / मेढा :
भोगवली मुरा गावाच्या हद्दीत एका चढावर टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.
जावली तालुक्यातील मेढ्यावरुन गाळदेवमार्गे महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर भोगवली मुरा गावाच्या हद्दीत चढ चढत असताना टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला. मात्र, गाडी घाटात पाठीमागे जावू लागताच चालकाने प्रसंगावधान राखत डोंगराच्या बाजूला गाडी वळवण्याचा प्रयत्न केल्याने गाडी थांबली अन् अनर्थ टळला. अपघातामुळे सर्व रस्ता बंद झाला असून, पुर्णतः या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मेढा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.