गुरुवारी डिस्चार्ज वाढला, 2281 जणांना घरी सोडले : 2065 अहवाल बाधित 48 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सातारा
जिह्यासाठी गुरुवारचा दिवस दिलासादायक ठरला. रोजच्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दोन हजारावर स्थिर होत असताना गुरुवारी 2281 जणांनी कोरोनावर मात केली. मात्र हॉटस्पॉट सातारा शहर व तालुक्यात दहा दिवसानंतर पुन्हा रुग्णांचा आकडा 500 पार झाला आहे. तर गेल्या 24 तासात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस दलाच्या कारवाया सुरूच असून लसीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साताऱयात दहा दिवसांनंतर पुन्हा रुग्ण वाढले
सातारा शहर व तालुक्यात सर्वाधिक वाढ होत आहे. 1 व 3 मे रोजी या तालुक्यात पाचशेवर रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दहा दिवस हा आकडा पाचशे पेक्षा कमी झाला होता. मात्र गुरुवारी या तालुक्यात पुन्हा 519 रुग्ण आढळले. त्यामुळे चिंता वाढली आहे.
दुसरा डोस घेणाऱयांची संख्या लाखाच्या पार
जिल्हय़ाला लसीचा पुरवठा कमी होत असल्याने विविध केंद्रावर लसीकरण गर्दी होत आहे. दुसऱया डोसच्या प्रतिक्षेत असलेल्यांना लस देण्याला आता प्राधान्य देण्यात येवू लागले आहे. मात्र, पुरवठा नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावलेलाच आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हय़ात 6,434 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे पहिला डोस घेण्याची एकूण संख्या 5 लाख 66 हजार 384 झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 9 हजार 64 जणांनी दुसरा डोस घेतला असून जिल्हय़ात एकूण लस घेणाऱयांची संख्या 6 लाख 75 हजार 448 एवढी झाली असल्याचे डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
2065 बाधित त्यात सातारा तालुका 519
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2065 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात सातारा तालुका पुन्हा पाचशेवर गेला आहे. अन्य तालुक्यांपेक्षा सातारा तालुक्यात मोठी वाढ झाली आहे. गेले आठवडाभर या तालुक्यात सरासरी चारशे वाढ होत होती. एकूण रुग्ण संख्येत कराड तालुका 20 हजाराच्या उंबरठय़ावर आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे- जावली 86 (6214), कराड 212 (18983), खंडाळा 107 (8129), खटाव 221 (11522), कोरेगांव 204 (11221),माण 152 (8774), महाबळेश्वर 13 (3581), पाटण 114 (5409), फलटण 308 (17479), सातारा 519 (29454), वाई 110 (9621 ) व इतर 19 (753) असे आज अखेर एकूण 131160 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
कराडला सर्वाधिक 8 मृत्यू
गेल्या चोवीस तासात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक 8 मृत्यू कराड तालुक्यात आहेत. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे- जावली 3 (135), कराड 8 (533), खंडाळा 4 (107), खटाव 9 (317), कोरेगाव 3 (271), माण 1 (169), महाबळेश्वर 0 (40), पाटण 1 (133), फलटण 6 (225), सातारा 7 (871), वाई 6 (260) , व इतर 0 असा आजअखेर जिह्यामध्ये एकूण 3061 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
2281 नागरिकांना डिस्चार्ज गेल्या चोवीस तासात 2281 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज बाधित आकडय़ापेक्षा डिस्चार्ज जास्त आहे. जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2281 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.