प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर व तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा काही कमी येण्याची चिन्हे दिसत नाहीत.कोरोनाच्या कात्रीत सर्वसामान्य वर्गापासून ते श्रीमंत व्यक्तीपर्यंत बाधित आढळून येत आहेत.आता तर अशी अवस्था बनली आहे की शेजारी कोण बाधित झाले हे कळत नाही.तो जेव्हा बरा होतो तेव्हाच समजते.खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत तर जिल्हा रुग्णालय आणि खावली येथील कोरोना सेंटरमध्ये दररोज किमान 15 रुग्ण नव्याने दाखल होत आहेत.
कोरोनामुळे एकदम बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या कोरोनाच्या तावडीतून कोणाची सुटका नाही.सातारा शहरात दररोज नवीन बाधित सापडत आहेत.जे बाधित आहे ते बरे होत आहेत.मृतांचा आकडा चिंताजनक आहे.रात्री आलेल्या अहवालात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयात पाडळी ता सातारा येथील 35 वर्षीय महिला व 72 वर्षीय महिला कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.तर सातारा तालुक्यातील करंजे 4, समर्थ नगर 3, आसनगाव 1, संगमनगर 4,सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 6, बुधवार पेठ 2,गुरुवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, सदरबझार 5, यादोगोपाळ पेठ 3, देगांव 2, कुमठे 1, संभाजी नगर 3, धनगरवाडी 1, पळशी 6, शाहुनगर 1,अपशिंगे 1, भरतगांव 4, फडतरवाडी 2, मल्हारपेठ 3, चिमणपुरा पेठ 3, पाडळी 1, पिरवाडी 11, माचीपेठ 1, शाहुपुरी 7, गोडोली 1, उरमोडी 2, संगम माहुली 1, कृष्णानगर 3, प्रतापगंज पेठ 3, पेट्री 1, खेड 1, गोकर्ण नगर 1, सोनावडी 3, मर्ढे 1, विकासनगर 4, खिंडवाडी 4, पाटखळ 1, भारतमारली 2, अंबंदरे 1, सैदापूर 1, व्यंकटपुरा 1, गोडोली 3, लावंघर 1, सदाशिव पेठ 2, सातारा 11 बाधित आढळून आले आहेत.