सोनगाव स. लिंबची मृत महिला बैलगाडीतून पडली अन रुग्णालयात बाधित झाली
प्रतिनिधी/ सातारा
एकेक कोरोना गाव बाधित करत चालला आहे.सातारा तालुक्यातील ग्रामीण भागात तर चांगलीच कोरोनाची धडकी बसली आहे.किरकोळ आजारी कोणी पडले तरी कोरोना झाला अशीच भीती वाटू लागली आहे.सोनगाव स.लिंबची महिला बैलगाडीतून चार दिवसांपूर्वी पडली होती.उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले होते.तिचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.तसेच सोनापूर येथील 62 वर्षीय वृद्ध, आणि कुस बु.येथील 70 वर्षीय वृद्धाचा असे तीन जणांचा काल दुपारपासून बुधवारी सकाळपर्यंत मृत्यू झाले आहेत.सातारा तालुक्यातील कोडोली, क्षेत्रमाहुली वगळता इतर कुठेही बाधित आढळून आले नाहीत.
सातारा तालुक्यातील सोनगाव येथील 62 वर्षाची महिला ही बैलगाडीतून शेतात निघाली होती. शेतात एका ठिकाणी बैलगाडीची धक्का बसून ती खाली पडली.त्या धक्यात तिच्या अंगावरून बैलगाडीचे चाक गेले होते.जखमी झाल्याने तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.रुग्णालयात उपचारादरम्यान तिला कोरोनाची लागण झाल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.तर तर सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये सोनगांव, क्षेत्रमाहुली ता. सातारा येथील 62 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. तिच्या मुलाला आणि सुनेला खावली येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, क्षेत्र माहुलीत एक कामगार बाधित झाला आहे.सोनापूर नागठाणे (ता. सातारा) येथील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.तर रात्रीच्या अहवालात कुस बु. (ता. सातारा) येथील 70 वर्षीय पुरुष कोविड बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.