प्रतिनिधी /सातारा :
सातारा शहर आणि तालुक्यातील टेस्ट वाढवण्यात आल्याने बाधित आढळून येण्याचे प्रमाण तेवढेच वाढले आहे.कोरोनाची दहशत अजून कायम असून कोरोनामुळे सातारा तालुक्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.बाहेरच्या तालुक्यातील एका बाधिताचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्या मृत बाधिताचा अंत्यसंस्कार धार्मिक पध्द्तीने करण्यात यावा अशी विनंती केली जात होती.मात्र, पालिकेचा आरोग्य विभाग आणि तालुक्यातील अधिकारी यांनी विरोध दर्शविला.त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.सायंकाळी उशिरा पर्यत ते नातेवाईक प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे मागणी करत असल्याचे समजते.
सातारा तालुक्यातील आणि शहरात टेस्ट वाढवण्यात आल्याने बाधित रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहेत.बाधित मृत झालेल्यामध्ये जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले सासपडे (ता. सातारा) येथील 67 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, भाकरवाडी ता. सातारा येथील 82 वर्षीय, खासगी हॉस्पीटलमध्ये गजवडी (ता. सातारा) येथील 63 वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा येथील 73 वर्षीय पुरुष व चिमणपूरा पेठ येथील 35 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.तर बाधितांच्यामध्ये सातारा तालुक्याती गुरुवापेठ 2, नने 1, शनिवार पेठ 13, प्रतिभा हॉस्पीटल 1, पाडळी 4, सातारा 9, यादोगोपाळ पेठ 2, नांदगाव 1, मालांज 1, वरणे 1, पिरवाडी 1, करंजे 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 5, कृष्णानगर 1, अतित 1, सदरबझार 2, राधिका नर्सीग होम, शाहुपूरी 3, गडकरआळी 1, भरतगाववाडी 18, अतित 1, सुटकेस चौक एमआयडीसी 9, वाढे 1, धावडशी 2, मल्हारपेठ 5, दौलतनगर 1, नागठाणे 2, गोडोली 2,पुसेवाडी 2, गुजरआळी 2, विकासनगर 2, खिंडवाडी 2, लिंब 1, अंबेदरे 1, हेडक्वाटर सातारा 8, असे बाधित आढळून आले.एका बाहेरच्या तालुक्यातील बाधित रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.त्यांच्या धर्माप्रमाणे अंत्यविधी व्हावा अशी विनंती त्यांनी पालिकेकडे केली.पालिकेच्या आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अंत्यसंस्कार केले जातील असे सांगितले. तर इतरांना सवलत देता आमच्या धर्माप्रमाणे विधी करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी पालिका व प्रांत अधिकारी यांच्याकडे केली.चर्चा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती,असे समजते.दरम्यान, पोलीस मुख्यालयात आठ जण बाधित झाले आहेत.त्यामुळे पोलीस दल व त्यांचे कुटूंबीय चांगलेच हादरले आहेत.पालिकेच्या शनिवार पेठेतल्या घरकुलात आणखी रुग्ण आढळून आले.