प्रतिनिधी/ सातारा
नागरिक कोरोनाचे लाईटली घेतात.काळजी करत नाहीत.लॉक डाऊनमुळे वैताग आल्याने बाहेर पडतात.गर्दी करतात मग आपोआप कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर रुग्णालयात उपचारासाठी भरती होतात.अशी सध्याची परिस्थिती आहे.सातारा तालुक्यात रात्रीच्या अहवालात 101 जण कोरोना बाधित आढळून आले तर 6 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्या सहा जणांमध्ये पाच जण वृद्ध इतर आजाराने त्रस्त होते.दोन दिवसांपूर्वी सातारा शहरातील दोन पत्रकारांना ही कोरोनाची बाधा झाली आहे.जिल्हा परिषदेत कोरोनाची एण्ट्री झाली आहे.
सातारा शहर आणि तालुक्यातील 194 गावांपैकी निम्म्याहुन अधिक गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.मोठय़ा लोकसंख्या असलेल्या गावात तर कोरोना हातपाय पसरले आहेत.त्यामध्ये शाहुपुरी, खेड, लिंब, नागठाणे, अतित, बोरगाव,निगडी या गावांचा समावेश होत आहे.शहरात अस कोणतं ठिकाण नाही की तेथे कोरोनाचा रुग्ण सापडणार नाही ते.प्रत्येक वॉर्डात कोणी ना कोणी बाधित आहे.सातारा शहरात दोन पत्रकारांना बाधा झाली आहे.जिल्हा परिषदेच्या एका कर्मचायाला बाधा झाली आहे.6 बाधितांचा मृत्यु झाला असून त्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे लिंब (ता. सातारा) येथील 65 वर्षीय महिला, कुमठे सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ सातारा येथील 68 वर्षीय महिला, शाहुपुरी सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, आंबेदरे सातारा येथील 85 वर्षीय महिला, दौलतनगर सातारा येथील 54 वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तर सातारा तालुक्यातील माची पेठ 1, वसंत नगर खेड 1, शनिवार पेठ 4, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 3, चिमणपुरा पेठ 1. तामजाईनगर 5,कोडोली 2,शाहुपुरी 4, सदरबझार 5, करंजे नाका 2, करंजे 2, सातारा 20, विकासनगर 1, शाहुनगर 4, सोनगाव 1, विलासपूर गोडोली 2, प्रतापसिंह नगर 1, व्यंकटपुरा 1, चंदननगर 1, गोळीबार मैदान गोडोली 1, विसावा नाका 3, जि. प. कार्यालय 1, केसरकर पेठ 1,
देगांव 1, जांभ (किकली) 1, निनाम पाडळी 1, वनवासवाडी 1, म्हसवे (वर्ये) 2, चिंचनेर 6, काळगाव 1, खडकी 1, लिंब 1, वर्ये 2, संगमनगर 2, नुने 1,आरळे 1,खेड बु. 2, खेड 1, देगांव फाटा 3, बोरगांव 1, अपशिंगे 1, हणुमंत चौक फत्यापुर 1 असे 101 बाधित झाले आहेत.