प्रतिनिधी/गोडोली
कोरेगाव तालुक्यात कोरोनाची धास्ती वाढवणाऱ्या त्रिपुटीच्या रुग्णाच्या संपर्कातील २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक अभिजित चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १२१ झाली आहे. दोन दिवसापूर्वी कोरेगावमधील त्रिपुटी येथील ट्रक चालकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह अन्य संपर्कातील अशा २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या सर्वांच्या तपासणीचे रिपोर्ट आज, मंगळवारी दुपारी निगेटिव्ह असल्याचे ग्रामस्थांना कळविण्यात आले. मात्र सर्वांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तर, ग्रामपंचायतीच्यावतीने गावात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे सरपंच सिंधू काटकर ,पोलीस पाटील सुषमा शेडगे, उपसरपंच यमाजी कुंभार यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.