सातारा / प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे पिकअप चालकास मारहाण करून जवळील पैसे चोरून नेणाऱ्या पाच जणांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. अनिकेत रमेश वाघ(वय 20),राज सतीश कदम(वय 26), गौरव धनाजी बर्गे(वय 22), अथर्व उर्फ मनोज सुरेश कदम(वय 19), निखिल सूर्यकांत बर्गे(वय 25, सर्व रा. चिंचणेर वंदन) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव, हवालदार दादा परिहार, पो.ना. सुजित भोसले, रमेश शिखरे, हणमंत सावंत, सुहास पवार, पो.कॉ.नितीराज थोरात, राहुल राऊत, सूर्यकांत कुडवे, उदयसिंह पावरा यांनी सहभाग घेतला होता.