सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी, दरोडा व अपहरण आदी गुन्हे असलेला तीन आरोपीना विविध ठिकाणी सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.प्रशांत सुनील बिसुरे(वय21,रा.खावली),राजकुमार नारायण नाईक(वय 35, रा.उंब्रज),जीवन साहेबराव मगर(वय29, रा.सनपाने) अशी तिघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या आदेशान्वये सातारा जिल्हातील
फरारी व पाहिजे असलेले आरोपी तसेच दुचाकी चोरीतील आरोपींना पकडण्या करिता विशेष मोहीम राबवली होती. आज दि. १९ रोजी सहायक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे यांनी पोलीस पथक तयार करुन जिल्हयात पाठविली व स्वत: पोलीस पथकासह सातारा शहर परिसरात पेट्रोलिंग करित असताना त्यांना गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि सातारा शहर पोलीस ठाणे कडील
अपहरणाचे गुन्हयातील सन २०१६ पासुन फरारी असलेला आरोपी पोवई नाका परिसरात येणार आहे त्या बातमी प्रमाणे त्यास सापळा लावुन पकडण्यात आले.
दि. 18रोजी फरारी व पाहिजे असलेले आरोपी पकडण्याच्या मोहीमेच्या अनुषंगाने एक पथक वडुज पोलीस ठाणे हद्दीत रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने वडुज पोलीस ठाणे कडील सन २०१३ पासुन दरोड्याच्या गुन्हयातील फरारी आरोपी यास सापळा लावुन पकडण्यात आले आहे.
दि. १६ रोजी सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीतील आरोपी हा पाचवड परिसरात येणार असल्याचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने त्यास सापळा लावुन दुचाकी सह पकडण्यात आले आहे. वरिल तिन्ही आरोपींना गुन्हयाचे तपासकामी
सातारा शहर पोलीस ठाणे, सातारा तालुका पोलीस ठाणे व वडुज पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस अंमलदार ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार अतिष घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के,
शरद बेबले, नितिन गोगावले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत,निलेश काटकर, मुनिर मुल्ला, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी सहभाग घेतला होता.