वाठार किरोली / वार्ताहर :
धामणेर ता. कोरेगाव येथील कोरेगाव पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय महिला कर्मचारी या कोरोनाबाधित सापडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ गावामध्ये भेट देवून पुढील यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे . कोरेगाव पंचायत समितीमध्ये काही पदाधिकारी कोरोना बाधित आढळले होते .त्यामुळे पंचायत समिती मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या , त्यामध्ये तीन कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामध्ये एक कर्मचारी धामणेर येथील आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांनी गावात येवून त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचे स्वँब घेवून तपासणीसाठी पाठवले आहेत व त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने शहाजी क्षीरसागर सरपंच संजीवनी सुतार, पोलीस पाटील जयवंत क्षीरसागर ,आरोग्य अधिकारी डॉ. निलेश शिंदे ,आरोग्य सहाय्यक जाधव ,तलाठी दीपक गोडसे ,ग्रामसेवक भरत जाधवव कोरोना कमिटी यांनी बाधित कुटुंबाच्या घरी जावून माहिती घेतली त्या कुटुंबाच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत .नागरिकांनी घरातून कामाशिवाय बाहेर पडू नये व तोंडाला मास्क असणे बंधनकारक आहे ते लावावेत असे आव्हान आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले .