सातारा / प्रतिनिधी :
वाईच्या धोम कॉलनीतील ज्ञानदेव अपार्टमेंटमधून रविंद्र महादेव दगडे (वय 48) हे दि.13 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. बाहेर फिरुन येतो असे सांगून ते घरातून निघून गेले. उंची पाच फुट पाच इंच, रंग सावळा, चेहरा उभट, बांधा सडपातळ, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा स्वेटर, काळ्या रंगाची टोपी, पायात निळ्या रंगाची स्लीपर असून, याची खबर कमल पवार यांनी वाई पोलिसात दिली आहे. सहाय्यक फौजदार लोखंडे तपास करत आहेत.