प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळा खासदार उदयनराजे यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. हा सोहळा हॉटेल लेक व्युव्हच्या हॉलमध्ये होणार आहे. तरुण भारतचे चंद्रकांत देवरुखकर आणि गौरी आवळे यांना ही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सातारा पालिकेच्यावतीने पत्रकारांना देण्यात येणारे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. पत्रकारीता क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सातारा पालिकेच्यावतीने पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात तरुण भारतचे चंद्रकांत देवरुखकर, गौरी आवळे यांच्यासह गजानन चेणगे, अजित जगताप, अरुण जावळे, चंद्रसेन जाधव, दीपक शिंदे, उमेश भांबरे, बबन धनावडे, संदीप राक्षे, ज्ञानेश्वर भोईटे, जयंत लंगडे, सिद्धार्थ लाटकर, संदीप कुलकर्णी, महेंद्र खंदारे, साई सावंत, विशाल पाटील, सचिन काकडे, रिझवान सयद, ओंकार कदम,प्रकाश शिंदे, प्रशांत जाधव, प्रशांत जगताप, अमित वाघमारे, पद्माकर सोळवंडे, प्रतीक भद्रे, मनोज पवार आणि विजय लासुरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
उद्या 17 रोजी सायंकाळी सातारा शहरातील पत्रकारांना छत्रपती प्रतापसिंह महाराज आदर्श पत्रकार पुरस्कार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.