सातारा/प्रतिनिधी
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना नगरसेविका सिद्धी पवार यांनी कचऱ्याचे डसबिन मोफत वाटले.त्याचे फोटो सोशल मीडियावर त्यांचे पती रवी पवार यांनी फोटो टाकले.त्यावरून दोघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा शाहूपुरी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निवडणूक अधिकारी यांनी कळलेल्या पत्रानुसार पद्माकर सोळवंडे यांनी सातारा शहरात रविवार दि.8रोजी सकाळी 10 वाजता प्रभाग 17 च्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी प्रभागातल्या सर्व अपरमेण्टमध्ये कोणतीही परवानगी न घेता भाजपचे चिन्ह असलेल्या कचऱ्याच्या डब्याचे वाटप केले.त्यांचे पती रवी पवार यांनी ते फोटो फेसबुक व व्हाट्सएपवर टाकले.आचारसंहिता भंग केल्याचे निदर्शनास आणले. त्यावरून सिद्धी पवार व रवींद्र पवार यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा सहाय्यक फौजदार कांबळे यांनी शाहूपुरी पोलिसात दाखल केला असून पोलीस नाईक माने तपास करत आहेत.