प्रतिनिधी / नागठाणे :
नागठाणे (ता.सातारा) येथील आर्टस् ॲण्ड काॅमर्स काॅलेजमधील दहा विद्यार्थ्यांना प्राचार्य बॅरि.पी.जी.पाटील व प्राचार्य सुमतीबाई पाटील शिष्यवृत्ती मिळाली.
सदरची शिष्यवृती ही ग्रामीण भागातील गरिब, होतकरु व गरजू विद्यार्थ्यांमध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता निर्माण करण्यासाठी दिली जाते. महाविद्यालयातील बी.ए.भाग-१,२ व ३ मधील युवाराणी माळी, ऋतुजा सावंत, अक्षदा साळुंखे, कादंबरी जगताप, अनुराधा जगदाळे, ऋतुजा लोरे, श्रावणी जगताप, संध्या चव्हाण, मोनिका चव्हाण व अनिता गाढवे या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्राप्त केल्यामुळे प्रत्येकी रू.२००० शिष्यवृत्ती मिळाली.
संबंधित विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता मा.डाॅ.जे.एस.पाटील, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रा.आर.आर.भोसले व प्रा.डि.यू.गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.