प्रतिनिधी / नागठाणे
नागठाणे (ता.सातारा) येथे युवतीने आत्महत्या केल्याची फिर्याद सोमवारी सायंकाळी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सुरेखा रामचंद्र देशमुख (वय. २६, रा.नागठाणे, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा रामचंद्र देशमुख ही युवती दोन दिवसांपूर्वी नागठाणे येथून बेपत्ता झाली होती. याबाबतची रविवारी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सोमवारी दुपारी तीचे कुटुंबीय शोध घेत असताना नागठाणे गावच्या हद्दीत मांगाचा माळ नावाच्या शिवारात असलेल्या विहिरीत एक मुलगी मयत अवस्थेत असल्याचे त्यांना समजले. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत पाहिले असता सदर मृतदेह हा बेपत्ता झालेल्या सुरेखा रामचंद्र देशमुख हिचा असल्याचे आढळून आले.
या घटनेची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.