उपाध्यक्षपदी दत्ता घाडगे, तर सचिवपदी सत्यनारायण शेडगे याची निवड
नागठाणे / प्रतिनिधी :
सातारा तालुक्यातील नागठाणे विभाग बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विकास जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दत्ता घाडगे तर सचिव पदी सत्यनारायण शेडगे यांची निवड झाली.
पत्रकार संघाच्या वार्षिक बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये एकमताने अध्यक्ष म्हणून विकास जाधव (काशीळ), उपाध्यक्षपदी दत्ता घाडगे (कामेरी) ,तर सचिव पदी सत्यनारायण शेडगे (भरतगाव) यांची निवड करण्यात आली. यावेळी ‘तरुण भारत’चे नागठाणे विभागाचे प्रतिनिधी संभाजी चव्हाण यांच्यासह विजय अलाटे यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.
बैठकीस सतीश जाधव, नितीन साळुंखे,प्रताप भोसले
सुहास काजळे, शरद पवार, धनाजी कणसे, दत्तात्रय क्षीरसागर, किरण पवार, अमित जगताप, विकास काटकर, संदीप कणसे, सागर नावडकर, प्रमोद पंचपोर,शंकर कदम, धनंजय माने, सचिन पडवळ या नागठाणे विभागातील विविध वृत्तपत्रांच्या पत्रकारांची उपस्थिती होती. सुनील शेडगे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत पवार यांनी आभार मानले.