प्रतिनिधी / सातारा
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन घोषित केले, सोमवार ते शुक्रवार निर्बंध कडक लादण्यात आले असून यात नाभिक व्यवसायावर अन्याय झाल्याचे मत सातारा नाभिक संघटने कडून करण्यात आले. सरकारने इतर सर्व व्यवसायांना मुभा दिली असून फक्त सलून व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले ते अन्याय कारक असून सरकारने याचा पुनर्विचार करून सलून व्यवसाय निर्बंधा सह चालू ठेवण्यास परवानगी द्यावी आमी सर्व नियमांचे काटेकोर पालन करू मात्र असे न झाल्यास आम्ही उद्या पासून सरकारी अन्यायकारक नियम झुगारून सर्व दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बाबत आम्ही गंभीर असून वेळ पडल्यास उपाशी मरण्यापेक्षा आत्मदहन करून मारू असा इशारा या वेळी संघटने तर्फे देण्यात आला आहे. या बैठकीत जिल्हातील सर्व नाभिक, सलून,ब्युटी पार्लरचे मालक सामिल होते .