प्रतिनिधी/ सातारा
जागतिक अपंग दिनानिमित्ताने सातारा पंचायत समितीच्यावतीने दि.8 रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सभापती सरिता इंदलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसभापती अरविंद जाधव, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, गटशिक्षणाधिकारी जयश्री शिगांडे, विस्तार अधिकारी जयश्री गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग सप्ताहानिमित्ताने समावेशित शिक्षण पंचायत समिती सातारा या विभागाच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निंबध, गायन, वादन, एकांकिका आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सभापती सरिता इंदलकर म्हणाल्या, प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्याला जर पालक व शिक्षकांनी तो गुण विकसीत होण्यासाठी जाणीवपूव्&ढक प्रयत्न केले तर तो विद्यार्थी जीवनात यशस्वी झाल्याशिवाय रहाणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुत्रसंचालन संगीता मदने यांनी केले. आभार शहाबुद्दीन शेख यांनी मानले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी विशेषतज्ञ शिक्षकांनी परिश्रम घेतले.