प्रतिनिधी / सातारा
राज्यातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली पंढरपूर येथे आज आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील वंचितचे कार्यकर्ते पंढरपूरला रवाना झाले.
त्याबाबत बोलताना वंचितचे चंद्रकांत खंडाईत म्हणाले, जिल्ह्यातील १०० कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहोत. राज्य सरकारने सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी मान्य केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.