वडूज / प्रतिनिधी
सार्वजनिक जीवनात काम करताना संधी ही सेवेचे माध्यम असते. आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित गोरगरीब घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे यांनी व्यक्त केले. तुपे यांची मानवी हक्क अभियान संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वडूज येथे विविध संस्था, संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी तुपे म्हणाले, आपण दोन वेळा जिल्हा परिषदेचे सदस्यपद भूषविले आहे. याकाळात सर्वसामान्य जनतेच्या अडचणी जवळून पाहील्या आहेत. संघटनेच्या माध्यमातून भूमिहिनांना गायरान जमीन देणे, घरकुल तसेच दलीत पददलीतांच्या अन्याय अत्याचाराविरूध्द आवाज उठविण्यात येणार आहे. सोमनाथ साठे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी हणमंत खुडे, धनंजय क्षीरसागर, विद्यासागर माने यांची मनोगते झाली. कार्यक्रमास गुरसाळेचे उपसरपंच सत्यवान कोकरे, दाऊद मुल्ला, हेमंत जाधव, गोविंद माळवे, संपत निकाळजे, सचिन साठे, श्री. गोरड, भांदिर्गे, आदी उपस्थित होते.
यावेळी पुणेस्थित उद्योजक जीवनशेठ पुकळे, दलीत विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव खुडे, मानवाधिकारचे सोमनाथ साठे, वंचितचे अजित साठे, शिक्षक बँकेचे माजी संचालक शशिकांत बागल, रासपचे माजी तालुकाध्यक्ष धनाजी चव्हाण, डॉ. बाळासाहेब झेंडे, जे.टी.धुळोप यांची प्रमुख उपस्थिती होती.