प्रतिनिधी/ सातारा
दरवषीं सातारा पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मोठा उत्सव आणि उत्साही वातावरण असते. गतवर्षीपासून कोरोनाच्या अनुषंगाने अतिशय साध्या पद्धतीने सातारा पालिकेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. रविवारी सकाळी सातारा पालिकेच्या 167 व्या वर्धापन दिनानिमित्ताने केवळ महापुरुषांच्या पुतळय़ांना अभिवादन पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह मान्यवरांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळय़ास, शाहु चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा केला.