अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार चार दिवसातून एखाद्या, दुसऱ्या टपरीवर होतेय कारवाई
सातारा / प्रतिनिधी :
सातारा पालिकेचा अतिक्रमण विभाग वरिष्ठांच्या सुचना येतील त्याप्रमाणे शहरात टुकूटूकू कारवाया करत आहे. दररोज एखादी दुसरी टपरी हटवली जात आहे. बुधवारीही पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने पोवई नाक्यावर पेट्रोल पंपाला लागून असलेले अतिक्रमण हटवले.
सातारा पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग नेहमीच तत्पर असतो. परंतु त्यांना जशा सुचना मिळतील तशी ती कारवाई करण्यात येते. शहरात अनेक अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमण हटवण्याबाबत कारवाई करण्याकरता पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत असते. काही अतिक्रमणांना अभय असते. तर काही अतिक्रमणे काढण्यासाठी ज्या सुचना मिळतात तसे पथक कारवाई करते. गेल्या चार दिवसापासून मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिलेल्या सुचनेनुसार ठिकठिकणी कारवाई सुरु आहे. त्यातच सातारा पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव विभागाचे पथक प्रमुख प्रशांत निकम यांनी कारवाई केली.