प्रतिनिधी/ सातारा
पालिकेत येणारा प्रत्येक नागरिक हा सुरक्षितता म्हणून सॅनिटायझर शॉवर मशीन बसवण्यात आले आहे.त्यामुळे बाहेरून आत येणारा नागरिक, पालिकेचा कर्मचारी हा त्या मशिनमध्ये सॅनिटायझर शॉवर घेऊन येईल.लोकांच्या काळजीसाठी शॉवर यंत्रणा बसवण्यात आली आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी दिली.
सातारा पालिकेच्या दोन्ही दरवाजापैकी एकच दरवाजा लॉक डाऊन सुरू झाल्यापासून सुरू ठेवण्यात आला आहे.त्याच दरवाजातून केवळ एका व्यक्तीला जर काम असेल तरच प्रवेश दिला जातो.ते ही हाताला सॅनिटायझर लावूनच आता शुक्रवारी सकाळी मशीन बसवण्यात आले.यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोरपडे, शरद काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष किशोर शिंदे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.घराबाहेर पडता कामा नये.सातारा पालिकेचे कर्मचारी, अधिकारी झटत आहेत.प्रत्येक प्रभागात जातात.काम करत आहेत.पालिकेत येताना प्रत्येकाची काळजी म्हणून सॅनिटायझर शॉवर मशीन बसवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.