कास / वार्ताहर :
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कास-बामणोली परिसरात निघालेली पर्यटकांची बस सकाळी साडे सातच्या सुमारास पिसाणी गावच्या हद्दीत पलटी झाली. या अपघातात चार पर्यटक जखमी झाले आहेत.
आज सकाळी एक बस कासच्या दिशेने निघाली असता पिसाणी गावच्या हद्दीत बस पलटी झाली. बसमधील चार पर्यटक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती पिसाणी ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी मदतकार्य केले.