दोन पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा फौजदार मिळाले
प्रतिनिधी/ सातारा
राज्य शासनाने बुधवारी व गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील पोलीस अधिकायांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकायांच्या बदल्यांचे गॅझेट पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी जाहीर केले. या गॅझेटमध्ये सातारा पोलीस दलात जम्बो बदल्या झाल्या आहेत. जिह्याला दोन पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा फौजदार मिळाले आहेत. तर जिह्यातून एक पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार फौजदार बदलून गेले आहेत.
जिह्यात पुणे ग्रामीणवरून सुरेश बोडखे, कोल्हापूरवरून संजय पतंगे हे पोलीस निरीक्षक म्हणून आले आहेत. जिह्याला चार नवे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. तर जिह्यातून तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बदली झाली असून एका अधिकायाला मुदतवाढ मिळाली आहे. सातारा जिह्याला 10 नवे फौजदार मिळाले असून चौघांना जिह्यातच मुदतवाढ मिळाली आहे. तर सातारा जिह्यातील चार फौजदार बदलून गेले आहेत.
बदलून आलेल्या अधिकायांची नावे पुढीलप्रमाणे कंसात कोठून आले ते ठिकाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख (वडूज) एक वर्ष मुदतवाढ, आरती नांद्रेकर, (कोल्हापूर), संतोष पवार (कोल्हापूर), नवनाथ गायकवाड (सोलापूर ग्रामीण), रविंद्र तेलतुंबडे (सोलापूर ग्रामीण), तर सातारा जिह्यातील शाम बुवा (सोलापूर ग्रामीण),विकास बडवे(कोल्हापूर), महेश भावीकट्टी (सोलापूर ग्रामीण) या अधिकायांच्या बदल्या झाल्या आहेत.
बदलून आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे कंसात कोठून आले ते ठिकाण – अनंत खाडे (सांगली), इसाक चौगुले (सांगली), प्रकाश उमाप, अन्वर मुजावर (दोघेही सोलापूर ग्रामीण), संतोष रोकडे,रवींद्र शिंदे,सुनील पवार, अनिल चौधरी, विजय चव्हाण (सर्व कोल्हापूर), सदाशिव स्वामी (सांगली) तर सातारा जिह्यातून अनिल शिरोळे यांची कोल्हापूर, राजेंद्र यादव, शिवराम खाडे दोघांची पुणे ग्रामीण, शिरीष शिंदे यांची सांगलीला बदली झाली आहे.