प्रतिनिधी / सातारा
सध्या गाजत असलेला प्रांत कार्यालयातले पार्किंग एका वेगळ्या वळणावर पोहचले आहे. प्रांत कार्यालयाच्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंग करण्यासाठी दुमजली इमारत उभी करण्याचा ठराव पालिकेच्या 2 नोव्हेंबर 2017 च्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे.त्याचे काम अंतिम मंजुरीत आले असून येत्या काही दिवसात पार्किंगचा प्रश्न मिटणार आहे, अशी माहिती नगरसेविका सीता हादगे यांनी दिली आहे.
प्रांत कार्यालयात आवारात पार्किंगवरून मारामारीचा प्रकार घडला होता. बाहेर ग्रेड सेपरेटरमुळे प्रांत, तहसील, मुद्रांक, भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्यास जागा नाही.तसेच स्टँप व्हेंडरकडे येणाऱ्या नागरिकांची वाहने बाहेर उभी करावी लागत आहे. कोरोनाचे कारण देत पार्किंग बंद करण्यात आले असल्याने मुद्दा गाजू लागला आहे. नगरसेविका सीता हादगे यांनी भविष्यात पार्किंगचा प्रश्न उदभवणार हे गृहीत धरून पालिकेत सर्व साधारण सभेत विषय मंजूर करून घेतला होता. त्यामध्ये दि. 2नोव्हेंबर 2017 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 17 व ठराव नंबर 149 सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.त्यानुसार पाठपुरावा सीता हादगे यांच्याकडून सुरू असून त्या माहिती देताना म्हणाल्या प्रांत ऑफिस समोरील सि.स ५०७ सदरबजार येथील आरक्षण क्रमांक १५९ च्या ठिकाणांची पार्किंग आरक्षण असलेली जागा तहसिल कचेरी समोरील बगीच्या असून या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून दुमजली पार्किंग करण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे.
ती जागा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील असून त्यांनी ती ची जागा नगरपालिकेकडे वर्ग केल्यास त्यावर नगरपालिकेचे नाव दाखल केल्यास त्या ठिकाणी दुमजली पार्किंग बांधले जाईल. हा जो काही पार्किंगचा बट्ट्याबोळ आणि नागरिकांना होणारा त्रास होत आहे. तो बंद होईल.शहरातील आणि बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची पार्किंगची सुविधा सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. यासाठी मी प्रभागातील नगरसेविका या नात्याने 2014 पासून ते आज अखेरपर्यंत या वाहनतळाच्या जागेसाठी सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातून काम होणे बाकी आहे. ते काम जिल्हाधिकारी यांनी मार्गी लावल्यास प्रभाग एक मध्ये दुमजली आणि सुसज्ज असे पार्किंग याठिकाणी बांधण्यात येईल.यासाठी तातडीने जिल्हाधिकारी साहेबांनी या मध्ये लक्ष घालावे, असे त्यांनी सांगितले.
Previous Articleसोलापूर : बाल गणेश मंडळ स्थापल्यास पालकांवर गुन्हा दाखल करणार
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.