सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील तामजाईनगर येथे वास्तव्यास असलेल्या प्राथमिक शिक्षिकेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही शिक्षिका 100 टक्के भाजल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
देवयानी सत्यवान हवाळे (वय 53, रा. तामजाईनगर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सत्यवान हवाळे हे सातारा जिल्हा परिषदेत सेवेत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी सेवा निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या पत्नी देवयानी या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून सवृश्रृत आहेत. ते दोघेच तामजाईनगर येथे रहात आहेत. आज दुपारी 12.30 च्या सुमारास दोघेच घरात असताना पाठीमागच्या रुममध्ये असलेल्या देवयानी यांनी अंगावर रॉकेल ओतून घेवून स्वतःला पेटवून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पेटवून घेतल्याची माहिती पुढच्या खोलीत बसलेल्या सत्यवान यांना समजताच त्यांनी देवयानी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.