औंध / प्रतिनिधी :
शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी सातारा येथील महिला महाविद्यालय कराड व सुटा सातारा कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळा उत्साहात पार पडली.
सकाळी महिला महाविद्यालय कराड व दुपारी सुटा कार्यालय सातारा येथे ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. रसूल कोरबु व प्रा. प्रकाश कुंभार यांनी ए.पी.आय,पी. बी.एस आणि एस.ए.आरबाबत प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणी व नवनवीन होत असलेले बदल याबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन केले व प्राध्यापकांना उदभवणाऱ्या अडचणी व शंकाचे निरसन केले.
सदर कार्यशाळेस एकूण 63 प्राध्यापक सहभागी झाले होते. कराड येथील कार्यशाळेस सुटाचे माझी अध्यक्ष प्रा.एन.के मुल्ला यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषविले तर सातारा येथील कार्यशाळेस सुटाचे विश्वस्त व मार्गदर्शक प्रा.ए.पी. देसाई सर यांनी अध्यक्षपद भूषविले.
कार्यशाळेस सुुटा अध्यक्ष साताराचे डॉ. ईला जोगी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेस सुटाचे पदाधिकारी. प्रा.आर .के. चव्हाण, प्रा.थोरात, प्रा.मनोज गुजर सिनेट प्रा. नरेंद्र गायकवाड . प्रा.डी.एस. काळे उपस्थित होते. प्रा. सुहन मोहोळकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. तानाजी कांबळे यांनी आभार मानले.