बलात्काराच्या खोट्य़ा गुह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण
प्रतिनिधी / सातारा
हनी ट्रॅपचे प्रकार वाढू लागले आहेत. फलटण येथील युवकास महाबळेश्वरला फिरायला जावू असे व्हॉट्सऍपवरुन कॉल करुन बोलवून घेवून हनी ट्रॅप केला. पाचगणीतल्या रिव्हर पॅलेस हॉटेलमध्ये थांबवून खोट्य़ा बलात्काराच्या गुह्यात अकडवू एक लाख रुपये दे, असे म्हणून मारहाण केली. त्याप्रकरणी एका युवतींसह फलटणच्या तीन जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने थंड हवेच्या पाचगणी शहरात चुकीचे प्रकार होत असल्याचे उघडकीस आले असून फलटणमध्येही खळबळ उडाली आहे.
याबाबत पाचगणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शार्दुल खलाटे (वय 22, रा. बिरदेवनगर फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि,.30 रोजी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास फलटणमध्ये सध्या रहात असलेल्या पुण्यातील युवतीने शार्दूल यांना व्हाट्सऍपवरुन कॉलकरुन आपण दोघे महाबळेश्वरला फिरायला जावू, मस्तपैकी एन्जाय करु,अशी भुरळ घातली. त्यामुळे शार्दुल याने तिला गाडीत घेवून महाबळेश्वरला घेवून निघाला. गाडीमध्येच तीने पाचगणीत थोडे थांबू, पाचगणी पाहु अन् पुढे जावू असे सांगितले. त्यानुसार शार्दुल याने गाडी हॉटेल रिव्हर पॅलेस येथे थांबवली. हॉटेलच्या रुममध्ये बॅग ठेवून ओळखपत्र देवून तासभर रुममध्ये थांबून दोघे बाहेर आले. तोच हॉटेलच्या परिसरात मारुती दिलीप शेलार, अमोल भिमा यमपुरे, सुरज शिवाजी देवकर (सर्व रा. फलटण) हे तेथे आले.
त्यांनी पार्किंगमध्ये दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवितो असे सांगून 1,00,000 रुपये खंडणीची मागणी केली व तु आम्हाला पैसे देत नसशील तर तुला पोलीस स्टेशनला अडकवतो असे सांगून दमदाटी केली. तसेच सोबत आलेल्या युवतीनेही तू त्यांना पैसे दे नाहीतर तुला मी खोटय़ा बलात्काराच्या गुह्यात अडकविन, अशी धमकी दिली. त्यावरुन त्या युवतीसह मारुती शेलार, अमोल यमपुरे, सुरज देवकर यांच्यावर दि.31 रोजी पाचगणी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 73/2020, भा द वि कलम 389,323,504,506,34 प्रमाणे दाखल आहे. गुह्याचा पुढील तपास स. पो. फो. कदम हे करीत आहेत.