सातारा / प्रतिनिधी
सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मध्यपी महिला आढळून आली. त्या महिलेचा पोशाख चांगला असल्याने व अंगावर दागिने असल्याने महिलेबाबत जागरूक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. सातारा पोलिसांनी त्या महिलेला बसस्थानक पोलीस चौकीत नेऊन तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. यावेळी ती महीला नशेत असल्याने ती पोलिसांना ती नेत्याचं नाव सांगू लागली. त्यामुळे पोलिसांना शोध घेणे अवघड बनू लागले. मात्र, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी महिला आढळून येण्याची घटना सातारा शहरात प्रथमच असून जागरूक नागरिकांनी पोलीस माहिती दिली नसती तर काय झाले असते अशी चर्चा सुरू होती.