अचूक बातमी “तरुण भारत” ची, मंगळवार, 27 एप्रिल, दुपारी 11.55
● सोमवारी अहवालात 1,666 बाधित ● मृत्युदर घटू लागल्याचा दिलासा ● पॉझिटिव्हिटी रेट 34.64 ● नेमके कोणत्या तालुक्यात किती ? ● सविस्तर अहवाल काही वेळातच ● “अचूक बातमी”चा अंदाज तंतोतंत खरा
सातारा / प्रतिनिधी :
संपूर्ण एप्रिल महिना जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा अक्षरशः कहर केला. गतवर्षीच्या सप्टेंबर आक्टोंबर पेक्षाही बाधित वाढीचे उच्चांकी आकडे येऊ लागल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र शुक्रवारी 2001 अशी भीतीदायक उच्चांकी बाधित वाढ समोर आली त्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण होत असतानाच प्रशासन अलर्ट झाले. जिल्ह्यात उपाय योजना एकीकडे सुरू असताना शुक्रवार नंतर बाधित वाढीचा वेग कमी आल्याचा दिलासा लाभत असला तरी काळजी घेऊन लढा सुरू ठेवणे हाच अंतिम पर्याय आहे. प्रशासनाने जिल्ह्यात रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, ऑक्सिजनची उपलब्धता आणि आता नव्याने शाहू क्रीडा संकुलात सुरू केलेल्या असतात 78 ऑक्सिजन बेड च्या हॉस्पिटलमुळे रुग्णांना दिलासा मिळू लागला आहे.
उच्चांकी बाधित वाढ थांबतेय
शुक्रवारच्या उच्चांकी 2,001 आकड्या नंतर शनिवारी 1,933 रविवारी 1,437 अशी बाधित वाढ समोर आली. तर सोमवारी 1666 अशी बाधित वाढ समोर आली आहे. सोमवारी अहवालात 26 बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे उच्चांकी बाधित वाढ घटल्याचा आणि मृत्युदर घटल्याचा दिलासा कालपासून लाभत आहे. दरम्यान जिल्ह्यात दररोज दोन अंकी आकड्याने सुरू असलेले मृत्यूसत्र ही थांबावे अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.
“अचूक बातमी”चा अंदाज तंतोतंत खरा
सोमवारी पहाटे 5 वाजता ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केलेल्या अचूक बातमीच्या माध्यमातून सोमवारी मंगळवारी उच्चांकी कोरोनामुक्ती होईल व बाधित वाढीचा वेग कमी येईल असा अंदाज व्यक्त केलेला होता. त्यानुसार तो अंदाज तंतोतंत खरा ठरत सोमवारी सायंकाळी तब्बल 1,898 जणांनी कोरोना मुक्त होत या लढाईला बळ दिले. हा कोरोनामुक्तीचा आज पर्यंतचा उच्चांकी आकडा होता.
सोमवारी अहवालात 1,666 बाधित
मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर मंगळवारी सकाळी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सोमवारी रात्रीच्या अहवालात 1,666 जणांचा अहवाल बाधित आला आहे. हा उच्चांकी बाधित वाढीचा मंदावलेला वेग दिलासादायक आहे. या अहवालानुसार एकूण 4 हजार 809 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,666 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 34.64 असा आहे.
बाधित वाढ रोखण्याचे आव्हान आहेच
जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. मात्र शुक्रवारच्या उच्चांकी 2,001 आकड्या नंतर शनिवारी 1,933 रविवारी 1,437, सोमवारी रात्री 1, 666 अशी बाधित वाढ समोर आली. त्यामुळे वेग मंदावला असला तरी बाधित वाढ रोखण्याचं आव्हान जिल्ह्याकडे अद्याप कायम आहे. बागेत आणि मृत्यू मध्ये नवीन उच्चांक झालेले नाहीत याचा दिलासा घेत वाटचाल सुरू आहे.
बेड, ऑक्सिजन साठी अद्याप पळापळ सुरुच
जिल्ह्यात एकूण उपचार घेणाऱ्यांची संख्या 18 हजारांच्या पार गेले असून त्यापैकी प्रत्यक्ष दवाखान्यात 3 हजारांच्या वर रुग्ण उपचार घेत आहेत मात्र दुसरीकडे उच्चांकी बाधीत वाढ होत असल्याने आता जिल्ह्यात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. बेड आणि ऑक्सिजन साठी बाधित आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची जीवघेणी धावपळ जिल्ह्यात सुरू आहे. प्रशासनाकडून सूचनांचा भडिमार सुरू आहे मात्र आरोग्य विभाग कमी मनुष्यबळाने त्रस्त आहे लसीकरण व रुग्णांवर उपचार अशा दोन्ही पातळीवर आरोग्य विभाग लढत असताना नागरिकांनीदेखील लॉकडाउन मधील नियम पाळून सहकार्य करत हा लढा जिंकण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे.
सोमवारी रात्री 1,437 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज तरी मृत्यूदरात वाढ होऊ नये अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. मात्र त्याची सविस्तर माहिती काही वेळात मिळेल.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण बाधित 95,056, एकूण कोरोनामुक्त 75,486, एकूण बळी 2,355, एकूण उपचारार्थ 17,146
सोमवारी जिल्हय़ात बाधित 1,434, कोरोनामुक्त 1,898, बळी 26