शहरात धूर फवारणीच नाही;नगरसेवक विशाल जाधव यांचा आरोप
सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरातून गोळा केले जाणारे बायोवेस्ट व्यवस्थित डिस्पोज केले जात नाही. कचरा डेपोत कशाही पध्द्तीने टाकले जात आहे. नेचर निडकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यालगतच बायोवेस्ट टाकण्यात आले आहे. तसेच शहरात धूर फवारण्या झाल्या नाहीत, असा आरोप नगरसेवक विशाल जाधव यांनी केलेला आहे.
शहरातला कचरा योग्य पध्दतीने गोळा केला जात नाही. पालिकेकडून योग्य ती कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे अलीकडे ठिकठिकाणी कचरा तसाच रहात आहे. कचरा डेपोत नेचर निड ही संस्था आहे. या संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बायोवेस्ट पडले आहे. याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. सध्या कोरोनाची साथ सुरू असून प्रत्येक वॉर्डात धूर फवारणी होत नाही. असलेल्या सहा फॉगिंग पंपाद्वारे कुठे फवारणी होत नसून औषध संपल्याचे सांगण्यात येते.साथ आणखी वाढल्यास कोण जबाबदार, फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विशाल जाधव यांनी केली आहे.